पुण्याची ही जागा भाजपकडे…. प्रचार चालू केला शिवसेनेने!

पुणे |  आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना सगळ्यांना उत्सुकता आहे ती ‘युतीच्या’ जागा वाटपाची. ‘युती’ होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यानं कोण मोठा भाऊ? कोण छोटा भाऊ? याची चर्चा जोरात सुरू आहे. शिवसेना भाजपमधलं जागावाटपाचं चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे. मात्र पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे असताना शिवसेनेने प्रचार चालू केला आहे.

कसबा मतदारसंघातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विशाल धनवडे यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक प्रचार सुरु केला आहे.

विशाल धनवडे यांनी युवासेना आणि महिला आघाडीला साथीला घेत प्रचाराला सुरुवात केली. शिवसेनेचा इच्छुक उमेदवार म्हणून कसबा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

सध्या युतीसमोर पुण्यातील जागांचा पेच निर्माण झाला आहे. पुण्यातील आठ जागांपैकी शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दोन्ही पक्षांना आपापल्या महत्वकांक्षा असल्याने माघार कुणीच घेत नाहीये. अशात जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत पुन्हा एकदा तु तु-मैं मैं होण्याची शक्यता आहे. सेना-भाजपमध्ये गेले काही दिवस तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-