…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!

वाराणसी |  देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जहरी टीका केली. तसंच काँग्रेसचा देवाच्या सोन्यावर डोळा असल्याचं म्हटलं. आता याच्याही पुढे जाऊन काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी घातली आहे.

कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी तसंच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.

काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात बंदी घालण्याचा फतवा काढल्यानंतर देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांना देखील चव्हाण कुटुंबाला प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहेत, म्हणून त्यांनी अश्या प्रकारची मागणी केली आहे, असं काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी म्हटलं आहे. दुसरीकडे माझ्या मागणीचा मोदी भक्तांनी आणि भाजप समर्थकांनी वेगळा अर्थ घेतल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे- एकनाथ शिंदे

-“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”

-शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी

-कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…

-…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना