Top news आरोग्य कोरोना देश

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल

sathyaraj e1641703479579
Photo Credit- instagram/ @actorsathyaraj

चेन्नई | गेल्या काही दिवसात देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांत अनेक मंत्री व नेत्यांसह दिग्गज कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. बाहुबली सिनेमातील कट्टपालादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्यराज कोरोनाशी लढत असल्याची माहिती समोर आली आहे.

सत्यराज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र, तब्येत बिघडल्याने सत्यराज यांना रूग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात आहे.

चेन्नईतील एका खासगी रूग्णालयात सत्यराज यांना दाखल करण्यात आलं असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. यासंदर्भात सत्यराज यांच्याकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

सत्यराज यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना चाचणीच्या अहवालातून त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं.

सत्यराज यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने शुक्रवारी त्यांना उपचारासाठी चेन्नईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

बाहुबली या चित्रपटात सत्यराज यांनी कटप्पाची भूमिका केली होती. कटप्पाच्या रोलने सत्यराज यांना संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवून दिली.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादायला सुरूवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

सेक्स रॅकेटमध्ये अटक झालेल्या थायलंडच्या तरूणींचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘जेंडर चेन्ज करून’