अमिताभ बच्चन यांचा दिलदारपणा; वयानं लहान असणाऱ्या ‘या’ स्पर्धकाच्या पडले पाया

मुंबई : सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ 11 वे पर्व सुरू झालं आहे. सर्व प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने या शो ची वाट पाहत असतात. अनेक लोक या शो मधून अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आतुर असतात. या शोमध्ये आलेले अनेक कंटेस्टंट बच्चन यांना भेटून उत्साहीत होतात. कोणी बच्चन यांना मिठी मारुन प्रेम व्यक्त करतं, तर कोणी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आपल्या भावना व्यक्त करतं. कौन बनेगा करोडपतीच्या या पर्वामध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. अमिताभ बच्चन स्वत: एका कंटेस्टंटच्या चक्क पाया पडले तेही आपल्याहून वयाने लहान असलेल्या कंटेस्टंटच्या पाया पडत असताना ते दिसत आहेत.

अमिताभ बच्चन पाया पडलेला स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधूताई सपकाळ या आहेत. देशभरातील 1200 लेकरांचं पालकत्व स्वीकारलेल्या समाज सेविका सिंधूताई सपकाळ ‘कौन बनेगा करोडपती’च्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात सहभागी झाल्या आहेत. हा भाग प्रेक्षकांना शुक्रवारी पाहता येणार आहे.

‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’मधून हॉटसीटवर विराजमान होण्यासाठी निवड झालेले स्पर्धक धावत ‘बिग बीं’च्या दिशेने येतात आणि उत्स्फूर्तपणे पाया पडतात, हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे. वयस्कर स्पर्धकाने पाया पडल्यास अमिताभ बच्चन संकोचून त्यांना विनम्रपणे थांबवतानाही आपण पाहिलं आहे.

सिंधूताई जेव्हा खेळात सहभागी होण्यासाठी सेटवर आल्या, तेव्हा त्यांचे पदस्पर्श करण्यापासून बिग बी स्वतःला थांबवू शकले नाहीत. वयाने लहान असल्या, तरी सिंधूताईंचं कर्तृत्व पाहून अमिताभ बच्चन सुद्दा स्वत:ला त्यांच्या पाया पडाण्यापासून रोकू शकले नाहीत.

तुम्ही नेहमी गुलाबी रंगाची साडी का नेसता? असा प्रश्न बिग बींनी सिंधूताईंना विचारला. त्यावर सिंधुताई यांनी अतिशय साजेसं उत्तर दिलं.

दरम्यान, जीवनात इतका काळा रंग पाहिला, आता तरी गुलाबी रंग पाहू दे, असं उत्तर सिंधूताईंनी हसतमुखाने दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-गेल्या 70 वर्षातली अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट स्थिती; निती आयोगाने दिली कबुली

-“नरेंद्र मोदींना सारखं-सारखं खलनायक ठरवणं चुकीचं”

-स्टेशनवर भिक मागणाऱ्या महिलेचं पहिलं गाणं हिमेशसोबत झालं रेकॉर्ड

-जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न!

-सर्वात कमी सरासरी असणाऱ्या ‘या’ खेळाडूंनी सावरला भारताचा डाव!