“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी भाऊ वाटतो, कारण…”

मुंबई | 2014 ला देशात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत गेल्या. देशपातळीवर आम आदमी पक्षाचा उद्य झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं आंदोलन यशस्वी झालं.

2014 साली देशात केंद्र सरकारमध्ये मोठं राजकीय परिवर्तन पाहायला मिळालं होतं. पहिल्यांदाच स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं केंद्रात सत्ता स्थापन केली.

तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं केंद्रात सत्ता स्थापन केली. अवघ्या देशात काॅंग्रेसविरोधी वातावरण तयार करण्यात मोदींना यश आलं होतं.

राजकीय महत्त्वाकांक्षा जसजशी वाढत गेली तसंतसं भाजपपासून त्यांचे एक-एक मित्र दुरावत गेले. भाजपचा सर्वात जवळचा मित्र असणारी शिवसेना भाजपला सोडून महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.

देशभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी आता शिवसेना पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुंबईत बैठक पार पडली आहे.

दोन तासांच्या सविस्तर चर्चेनंतर केसीआर यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमने उधळली आहेत. उद्धव ठाकरे आणि मी आम्ही दोघेही भाऊ वाटतो कारण आम्ही दोघांनी सहकार्यानं काम केलं आहे, असं केसीआर म्हणाले आहेत.

तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये 1 हजार किलोमिटरची सीमा आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यानं आम्ही चांगला प्रकल्प तयार केला आहे, असं केसीआर म्हणले आहेत.

आम्ही तयार केलेल्या कालेश्वरम प्रकल्पामुळं तेलंगाणाचं नशीब उजळलं आहे. या प्रकल्पाचा आमच्या राज्याला खूप फायदा झाला आहे. आम्ही यापुढेही समन्वयानं काम करण्याची तयार करत आहोत, असं केसीआर म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या भेटीनंतर राज्यासह देशाचं वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपनं या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे” 

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना

  ‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’

  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका