मनोरंजन

“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”

मुंबई |  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे आता विविध ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. याचाच फायदा मराठी मुलांनी घ्यावा, असा सल्ला मराठी अभिनेता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिला आहे.

परप्रांतीयांनी महराष्ट्रातील तरुणांचा रोजगार पळवतात, अशी टीका नेहमीच होत असते. पण परप्रांतीय त्यांच्या-त्यांच्या राज्यात गेल्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि नोकऱ्यांची संधी मराठी तरुणांसाठी आली आहे. मराठी तरुणांनी ही संधी सोडता कामा नये, असं केदारनं लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आता सर्व नोंदणी करून आपापल्या गावाचा मार्ग धरतायत. सरकारी कार्यालयात आपल्याकडे त्यांचा डाटा उपलब्ध झालाय. मराठी तरूणांना ते करीत असलेल्या कामांची माहिती करून द्यावी! मराठी तरूणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका.. त्यांनी काम हिसकावली!, असं केदार शिंदे यांनी म्हटलंय.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठी तरूणांना आवाहन केलं आहे की, “मिळालेले किंवा उपलब्ध झालेले रोजगार आपल्यासाठी संधी आहे ती संधी आपण चुकवायला नको. शासनाने देखील उपलब्ध झालेल्या रोजगाराची माहिती मुला-मुलींपर्यंत पोहचवायला हवी”.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

-रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत

-आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड, ‘या’ छुप्या पद्धतीनं काढून टाकलं जातंय

-“मजुरांच्या गाड्यांना बंगालमध्ये प्रवेश न देणं हे माणुसकीला धरून नाही”

-आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट