देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

नवी दिल्ली |  भाजपला चारी मुंड्या चित करत अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत हिरो झाले. 70 पैकी 62 जागा मिळवत ‘दिल्ली विकासाचा चेहरा’ आपणच असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. येत्या 16 फेब्रु. रोजी तिसऱ्यांदा केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र या शपथविधीसाठी केजरीवाल देशातल्या कोणत्याही नेत्याला वा इतर राज्यातील कोणत्याही नेत्याला आमंत्रित करणार नाहीत.

आम आदमी पक्षाचा विजय दिल्लीकरांनी प्रचंड बहुमतांनी केलाय. या विजयाचे खरे शिल्पकार दिल्लीकर आहेत. त्यांच्या साक्षीने केजरीवालांचा शपथविधी व्हावा असा ‘आप’चा मानस आहे असल्याचं आपचे नेते गोपाल राय यांनी सांगितलं.

अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतील. रामलीला मैदानावर केजरीवालांचा हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केजरीवालांच्या शपथविधीला दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असं आवाहन केलं आहे. आपला भाऊ, आपला मुलगा शपथ घेणार आहे त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद द्या… प्रेम द्या… असं सिसोदिया म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-राजकीय पक्षांना न्यायालयाचा दणका; उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर…

-भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची वर्णी!

-इंदुरीकराच्या मुसक्या आवळा; तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा

-‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाचं होणार बॉलिवूडमध्ये लॉन्चिंग

-न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे; विजय सत्याचाच होईल- रोहीत पवार