“महिलेचे कपडे उत्तेजक असतील आणि लैगिक छळ झाला, तर…” – न्यायालय

नवी दिल्ली | जर एखाद्या महिलेने उत्तेजक वस्त्रे (Sexually Attractive Clothes) परिधान केली असतील तर तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीवर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

असे निरीक्षण केरळमधील (Kerala) एका न्यायालयाने नोंदविले आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन (Civic Chandran) यांना अटकपूर्व जामिन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.

चंद्रन यांनी याप्रकरणी तक्रारदाराचे फोटो याचिकेसोबतच न्यायालयात सादर केले होते. त्याच्या आधारे न्यायालयाने त्यांना (दि. 12) रोजी अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

यावेळी निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने म्हंटले आहे की, महिलेने परिधान केलेल्या कपड्यांमुळे लैंगिक उत्तेजन निर्माण होऊ शकते. त्यामुळे कलम 354 नुसार प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

संबंधीत महिलेने आपल्या विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप लेखक चंद्रन यांनी केला होता. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात घडलेल्या कथित घटनेचा संदर्भ देत चंद्रन म्हणाले, महिलेसोबत त्यावेळी तिच्या प्रियकरासोबत इतर अनेक लोकांची उपस्थिती होती.

त्यापैकी एकाने सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली नाही, त्यामुळे त्यांनी त्या महिलेवर खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण… आदित्य ठाकरेंची बंडखोरांना अट

रेवडी प्रकरण: आश्वासने देणे धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

विनायक मेटे अपघात प्रकरण: मेटेंच्या ड्रायवरचा मोठा खुलासा

‘दोन बायका अन् अनुराग कश्यपचे ऐका’

उद्यनराजेंनी तोंडाने भरवला पेढा…