केरळमधील महापुराचे काळजाचा थरकाप उडवणारे फोटो…

केरळमध्ये पडणारा भयानक पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराची भयानक दृश्य सध्या समोर येत आहेत. यातील काही काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य या पोस्टमध्ये पहायला मिळणार आहे. सोबत पुराबद्दल आणखी माहिती देण्यात आलेली आहे. ती माहितीही काळजीपूर्वक वाचा-

1

केरळच्या पुरात 324 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2 लाख नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.

2

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर, गंभीर जखमींना 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. याशिवाय मोदी यांनी पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला 500 कोटी रूपयांची मदत जाहिर केली आहे. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला 100 कोटींची मदत जाहिर केली होती.

4

केरळमध्ये आलेला महापूर हा 100 वर्षांतील सर्वांत भयानक महापूर असल्यानेच नमूद करत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

5

पंजाब सरकारने देखील मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. 5 कोटींचा निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी तर उर्वरित 5 कोटी रुपये अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या रुपात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारकडून 10 कोटी, तेलंगणाकडून 25 कोटी रुपयांची मदत केरळमधील पुरग्रस्तांसाठी देण्यात आली आहे.

6

केरळमधील जनजीवन पुरामुळे पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेलेले आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही मोठा फटका बसला आहे.

 

7

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद करण्यात आलं आहे. लष्कर, नौदल आणि हवाई या तिन्ही दलांकडून दिवस-रात्र बचावमोहिम सुरु आहे.

8

केरळमध्ये 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलं आहे. गेले 9 दिवसापासून पुरानं थैमान घातलं आहे. केरळसाठी  देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे.

9

 

11

केरळमध्ये आत्तापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर लाखाच्या पुढे लोक बेघर झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

12

13

पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे.

14

15

गुजरातमधील रतलाम येथून 14 लाख 50 हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण 21 लाख 50 हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे. 

16

18

पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर आज शनिवारी दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.

19

20

केरळमधील अलाप्पुझा, एर्नाकुलम, पथनमतित्ता आणि त्रिशूर या जिल्ह्यांतील पूरस्थिती अत्यंत भयानक आहे. पंपा, पेरियार आणि चालाकुडी नद्यांनी पाणीपातळी ओलांडली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून महापुरासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

21

22

केरळच्या पुरात 324 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2 लाख नागरिक बेघर झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले आहेत. केरळमध्ये आलेला महापूर हा 100 वर्षांतील सर्वांत भयानक महापूर आहे. 

 

23