“ताई, मन मोठं करा…, अजितदादा तुमचं तरी ऐकतात का पाहू?”

मुंबई | केंद्र सरकारने गॅसचे दर आणि पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. यावरून भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळेंसह महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला आहे.

ताई मन मोठं करा, अजितदाद तुमचं तरी ऐकतात का पाहू, असं म्हणत भाजपने सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्येय यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

सुप्रिया सुळे ताई, मन मोठं करा! केंद्राने अगोदरच कर कपात करून इंधन दर कमी केले आहेत. आता पाळी आहे जनतेच्या खिशातून ओरबाडणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी वसुली सरकारची, अशी टीका केशव उपाध्येय यांनी केली आहे.

केंद्राच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याऐवजी हा सल्ला थेट अजित पवार यांना द्या. ते तुमचं तरी ऐकतात का पाहू?, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. केशव उपाध्ये यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेल्या महिन्याभरात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काहीशा मंद गतीने होत असली, तरी देखील हे दर 100 रुपये प्रतिलिटरच्या वर गेले आहेत. त्यामुळे आधीच सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असताना दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅसचे देखील दर वाढू लागले आहेत.

केंद्र सरकार राज्यांकडे दर कपातीसाठी बोट दाखवत असताना राज्य सरकारे देखील केंद्राकडे यासाठी मागणी करत आहेत. त्यामुळे नेमकी दरकपात कुणाच्या हातात आहे, हेच सामान्यांना कळेनासं झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत दरकपातीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर भाजपनं खोचक शब्दांत सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट; पोतानिन यांच्या पत्नीने मागितलेली रक्कम ऐकून थक्क व्हाल 

10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख 

Omicronच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! 

‘मी पाहिलं तेव्हा बिपीन रावत जिवंत होते…’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा 

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार?”