“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

मुंबई |   21 मे रोजी राज्यात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. काँग्रेसने एक ऐवजी दोन उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोध निवडणूक होण्यावर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. याचमुळे शिवसेना नाराज असल्याचं कळतंय. या साऱ्या प्रकरणावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

एकीकडे राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतोय. राज्यात कोरोनाग्रस्तांनी 20 हजार हजारांचा टप्पा पार केलाय. आणि सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

राज्यात 20 हजारचा आकडा कोरोनाग्रस्तांनी गाठतोय. पोलिसांतील बाधितांची संख्या मोठी आहे. मृतदेहाशेजारी उपचार करावे अशी संतापजनक परिस्थिती आहे. मात्र राज्यातील 3 सत्ताधारी पक्ष कुरघोडीच्या राजकारणातच मग्न आहेत. आधी आमदार… कस होणारं …आता कुणाचे किती होणारं? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपने 4 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, उमेदवार देणार आहे. आधीच्या रणनितीनुसार काँग्रेस एकच उमेदवार देणार होता. मात्र काँग्रेसने आता 2 उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना रिंगणात उतरवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

-“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”

-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?

-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा

-केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका