महाराष्ट्र मुंबई

‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल

Ketaki Chitale 2

मुंबई |  अभिनेत्री केतकी चितळेविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईच्या भांडूप पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे राजू थाटे यांनी केतकीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेची 1 मार्च रोजी केलेली फेसबूक पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी तिला सुनावलं देखील आहे.

केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, “नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे, असं तक्रार करताना थाटे यांनी लिहिलं आहे.

केतकी चितळेची फेसबुक पोस्ट-

महत्त्वाच्या बातम्या-

-विद्या चव्हाणांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले; म्हणतात, ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध’!

-मोदींनी सोशल मीडिया सोडू नये; त्यांचे करोडो फॅन्स अनाथ होतील- संजय राऊत

-“पवारांच्या धसक्यामुळे तर मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचा विचार केला नसेल ना??”

-“जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी…. अन् मोदी आहेत तोपर्यंत मी!”

-…म्हणून मोदींनी सोशल मीडिया बंद करायला 8 दिवसांचा वेळ घेतला असेल- जितेंद्र आव्हाड