बौद्ध समाजावर टीका करत अभिनेत्री केतकी चितळेनं फोडलं नव्या वादाला तोंड!

मुंबई | मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादच्या भोवऱ्यात सापडली आहे. केतकीने 1 मार्च रोजी फेसबुक पोस्ट लिहली या पोस्टमध्ये केतकीने बौद्ध समाजावर टीका केली आहे. केतकीने केलेल्या पोस्टवर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.

नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क असल्याचं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे. केतकीच्या याच वक्तव्यावरुन आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात केतकीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

केतकी चितळेने केलेल्या या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलचं वादंग निर्माण झालं आहे. केतकीने जातीविषयी बोलल्याने हा वाद आणखी चिघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्ह करताना हिंदी भाषेतून बोलल्याने नेटकऱ्यांनी केतकीला कमेंटमध्ये अश्लील भाषेत कमेंट्स केल्या होत्या. त्यावरुही केतकी चांगलीच चर्चेत आली होती. केतकीला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या 5 जणांना त्यावेळी बेड्याही ठोकल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-“सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा”

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार फडणवीसांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

-अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा; तृप्ती देसाई आक्रमक

-“मोदीजी, जरा बेरोजगारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांबाबतही पुढाकार घ्या म्हणजे अडचणी समजतील”

-सारथी संस्थेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड