मोठी बातमी! केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

केतकी चितळेला नवी मुंबईच्या कळंबोली येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने ही कारवाई केलीये.

ठाणे गुन्हे शाखा घटक 1 ने केतकी चितळेचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले होते. सध्या कळंबोली पोलीस ठाण्यात केतकीच्या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेचे पथक तिला ठाण्यात घेऊन येणार असल्याची माहिती आहे.

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे.

ठाणे आणि पुण्यात या तक्रारींच्याआधारे गुन्हाही दाखल करण्यात आला. तर केतकी चितळेविरोधात राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले… 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…” 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान 

मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच…