मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला (Ketaki Chitale) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे.
आजही कोर्टानं केतकीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 9 दिवसांनी तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी 16 जूनला घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. केतकीने तिच्याविरोधातील दाखल गुन्हा रद्दबातल करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तकारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटकेची कारवाईही बेकायदा आहे, असा दावा करत व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसानभरपाई मिळण्याची विनंतीही केतकीने याचिकेद्वारे केली आहे.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत पोस्ट करत खळबळ माजवली होती. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; धक्कादायक आकडेवारी समोर
‘तारक मेहता’ मालिकेच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!
रेल्वेने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आता अरुण गवळीचं कनेक्शन समोर
Monsoon Update | येत्या 2 दिवसांत ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार