मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला (Ketaki Chitale) पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देण्यात येऊ शकतं नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. यामुळे केतकीचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.
केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.
केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत पोस्ट करत खळबळ माजवली होती. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका
सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम
महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय