शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावलं आहे. राज ठाकरेंनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काही लिहून पोस्ट केलंय. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं राज ठाकरे म्हणालेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…” 

‘मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर…’; नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना नवं आव्हान 

मुंबईतील सभेपूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता लवकरच… 

 चिंतन शिबीर सुरू असतानाच काॅंग्रेसला जोर का झटका; ‘या’ मोठ्या नेत्यानं सोडला पक्ष

 “बुस्टर डोस माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”