पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यात चार प्रमुख धरणांच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी 1 वाजता 11.99 क्युसेक करण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 22 मिलिमीटर, पानशेत धरण भागात 84 मिलिमीटर, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात अनुक्रमे 75 आणि 60 मिलिमीटर पाऊस पडला.

पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

आजुबाजूच्या गावात पाणी शिरण्याची भीती आहे. दरवर्षी पावसामुळे अनेकांचं नुकसान होतं. त्यामुळे काळजी घेण्याचं आणि स्वत:चा बचाव करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पावसाचं प्रमाण वाढलं तर विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचाय” 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा! 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम 

“मंत्री-संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार” 

‘उद्धव ठाकरेंना दुखावणं म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं’ -सुप्रिया सुळे