अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?

पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अनेक राजकीय नेते येत्या काळात पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेही राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र, घटस्थापनेचा मुहूर्त टळल्यानं ते येत्या गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे.

खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुहूर्तावर खडसे यांच्या समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबरच भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. एकीकडे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्याला साफ नकार दिला आहे.

एकनाथ खडसे भाजप पक्ष सोडून कोठेही जाणार नाहीत, असं पाटील यांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशावर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाथाभाऊ कोठेही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे ते अतिशय जेष्ठ नेते आहेत. नाथाभाऊ आमचे मार्गदर्शक देखील आहेत. यामुळे सर्वांचा हिरमोड होईल भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम तयार झाला आहे. मात्र, एकनाथ खडसे भाजप सोडणार का?, याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर

स्वतःचाच ‘तो’ विक्रम मोडत शिखर धवन ठरला ‘चौकार किंग’!

काय सांगता! काहीच डाऊन पेमेंट न करता ‘ही’ गाडी खरेदी करता येणार

सचिन तेंडूलकर नंतर आता केएल राहुलनंही केला ‘तो’ विक्रम!