मुंबई | जगभरात उच्छाद मांडलेल्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे लाखोंच्या संख्येने नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. एकिकडे जगभरात चिंतेचं, भीतीचं वातावरण आहे आणि अभिनेत्री किम शर्मा हिला एक चांगलाच विनोद सुचला आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
किम शर्माने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिला कोरोनावरून बिअरची आठवण झाली आहे. अभिनेत्री किमने इन्स्टाग्रावर एक पोस्ट करून काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये तिच्याबरोबर अभिनेत्री प्रीती झांगियानीला देखील पाहायला मिळत आहे.
हा बँकॉकमधील एका रात्रीचा थ्रोबॅक फोटो, त्यावेळी आम्ही तरूण आणि बेफिकीर होतो आणि त्यावेळी कोरोनाचा अर्थ केवळ फॅन्सी बिअर एवढाच होता, असं किमने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिलं आहे. तिच्या या कॅप्शनवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांना तिच्या कॅप्शनमधील उपहासात्मकता आवडली आहे. तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर केले जाणारे विनोद तसंच मीम्स या गंभीर परिस्थितीमध्येही हसवण्याचं काम करतात.
महत्वाच्या बातम्या-
-आणखी जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही- रुपाली चाकणकर
-चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट
-बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत
-मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील
-“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”