मी अनेकदा बँकांना सर्व पैसे देण्याची ऑफर दिली होती पण…- विजय मल्ल्या

मुंबई | बँकांना कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यानं सर्व कर्जाची रक्कम परत करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानं यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

मी अनेकदा बँकांचे सर्व पैसे देण्याची ऑफर दिली आहे. पण आपल्याला बँक आणि सक्चवसूली संचलनालयाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं विजय मल्ल्यानं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं संपूर्ण भारतात लॉकडाउन केलं आहे. याचा कोणीही विचारदेखील केला नव्हता. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. यामुळे माझ्या सर्व कंपन्यांचं काम ठप्प झालं आहे. सर्व प्रकारचं उत्पादनही बंद आहे. याव्यतरिक्त आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत नाही आणि त्यांना त्यांचा मोबदलाही देण्यात येत आहे. सरकारला आमची मदत करायला हवी, असंही मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मल्ल्यानं बँकांचं 9 हजार कोटी रूपयांचं कर्ज अद्यापही फेडलं नसून त्यानं 2016 मध्ये भारतातून पलायन केलं होतं. त्यानं किंगफिशर एअरलाईन्ससाठी हे कर्ज घेतलं होतं.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-“असंही एक दिवस मरणारच आहोत, त्यासाठी देश लॉकडाऊन करू शकत नाही”

-“मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यांना देश समजला नाही… त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही”

-कोरोनाच्या संकटात BSNLच्या ग्राहकांना गुडन्यूज; वैधता वाढली, इतक्या रुपयांचं रिचार्जही मोफत

-कौतुकास्पद! कोरोनाने हैदोस घातलेल्या स्पेनमध्ये मेसीने दिले तब्बल इतके कोटी

-अवधूत वाघांवर बहुतेक कोरोनाच्या धास्तीने परिणाम झालायं- अमोल मिटकरी