मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशीत करत असतो. अनेक कलाकार या कॅलेंडर साठी फोटोशूट करून घेतात. या कॅलेंडरमधील अभिनेत्री कियारा अडवाणीच्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. हा फोटो कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कियारा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अलिकडेच तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘गिल्टी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.
दरम्यान, या चित्रपटात ती नानकी ही भूमिका साकारत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-20 लाख रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ‘त्या’ पोलिस कर्मचारऱ्याला ठोकल्या बेड्या
-आता खिशात घेवून फिरता येणार वॉटर फिल्टर; युवा अभियंत्याने लावला शोध
-भाजपला औरंगाबादमध्ये मोठा धक्का; सात ते आठ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
-इंदोरीकरांनी लेखी माफी मागितली आहे आता जास्त खोलात जावू नका- रोहित पवार
-मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार शिवनेरीवर भव्य शिवजन्मोत्सव सोहळा