आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

मुंबई | आपल्या अभिनयानं अभिनय क्षेतात योगदान देणारे अभिनेते अनेक कारणांनी वादात अडकत असतात. सध्या मराठी कलाकार किरण माने यांच्याभोवती मोठा वाद उभा राहिला आहे. अशात किरण माने यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं घोषित केलं आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत आघाडीची भूमिका साकारणारे अभिनेते किरण मानें यांना अचानक काढून टाकल्यानं राज्यात मोठा वाद उभारला होता. आता या वादात आणखीनच भर पडणार आहे.

मालिकेतून मला न सांगताच काढून टाकण्यात आल्याची टीका यापुर्वी माने यांनी केली होती. राज्यात किरण माने यांना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडल्यानं या प्रकरणाला राजकीय स्वरूप आलं होतं.

किरण माने या प्रकरणानंतर लागलीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं होतं. अशात त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली होती.

आता किरण माने यांनी फेसबूक पोस्ट करत आपण उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेत असल्याचं म्हटलं आहे. परिणामी राज्यात माने यांच्या पत्रकार परिषद घेण्याच्या घोषणेनंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

खूप खुलासे करणार आहे, खूप गुपित उलघडायची आहेत, असं म्हणत किरण मानेंनी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.  तुम्हाला न सांगता कामावरून काढायची हिम्मत नाय झाली पाहीजे कोणाची, असं किरण माने म्हणाले आहेत.

किरण माने हे आपले वकील असीम सरोदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेणार आहेत. कोणतीही स्त्री असेल किंवा पुरूष असेल तुमच्यावर आरोप करण्याअगोदर हजारदा विचार करेल असं काहीतरी करून दाखवतो, असं किरण माने म्हणाले आहेत.

अन्याय करायला या लोकांनी खूप चुकीचा माणुस निवडला आहे. खूप हार्ड माणसाला हात घातलाय यांनी, आता यांना नाय पळता भुई थोडी केली तर नावाचा किरण माने नाव सांगणार नाही, असंही किरण माने म्हणाले आहेत.

दरम्यान, किरण माने हे पत्रकार परिषद घेऊन कोणता मोठा गौप्यस्फोट करणार आहेत याची उत्सुकता आता अवघ्या राज्याला लागली आहे. किरणौ माने वादानं मराठी सिनेक्षेत्रातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

पाहा पोस्ट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?” 

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”