मुंबई | प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
किरण नगरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना गुरूवारी रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केलं होतं. मराठी साहित्य विश्वात त्यांची सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड ही कादंबरी प्रचंड गाजली.
किरण नगरकर यांच्या सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड या दोन्ही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वातील क्लासिक कादंबरी म्हणून गणल्या जातात.
दरम्यान, किरण नगरकरांना हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
चित्रा वाघ आणि धनंजय महाडीक यांच्यावर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी! – https://t.co/4nnPMXYzfS @ChitraKWagh @dbmahadik @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
“घोटाळ्याच्या नादात अशी झाली दैना… पवार गुरूजींच्या शाळेत विद्यार्थीच राहिना…!” https://t.co/2EOry6Voe3 @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
“शिवसेनेने फक्त माझं तिकीटच कापू द्या… माझा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” https://t.co/sAr6FtdIla @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019