“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “

नवी दिल्ली | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) हे दलाल असून ते सतत इतरांना धमकावण्याचे काम करतात, असा आरोप केला होता.

ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचं मुलुंडच्या दलालाने सांगितलं, जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. तसंच असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्याने मारू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

दरम्यान, काल किरीट सोमय्या दिल्लीकडे रवाना झाले होते. ते या आरोपांना कसे सामोरे जातात, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन 19 बंगल्यांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले. तसेच हे पुरावे मी याआधीदेखील पत्रकारांसमोर ठेवले होते, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांनी कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलावं असं सोमय्या यांनी म्हटलं. कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराप्रकरणी अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोव्हिड सेंटरमधील घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याच्यावर कारवाई होत नाही. सगळे पुरावे दिले तरी कारवाई होत नसल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत आम्हाला तुरुंगात डांबण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर राग काढायचा होता तर नील सोमय्या यांच्यावर आरोप करण्याची आवश्यकता नव्हती, असंही सोमय्या यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पाच वर्षापूर्वीची माहिती दिली. आमची खुशाल चौकशी करावी आम्ही तयार आहोत असं प्रतिआव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू

“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय” 

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा