Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“ठाकरे सरकारचं गांजावर गजब प्रेम आहे”

Uddhav Thackeray2 e1583982782627

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गांजाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना विरोधकांकडून सरकारला घेरण्याचं काम सुरू आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थितीवरून विरोधक अनेक सवाल उपस्थित करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकरांची जीभ घसरली.

खुर्चीवर बसून गांजा पिणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांप्रमाणे टीका करणं सोपं असतं. मात्र महापालिका परिस्थिती बघून काम करते, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांवर केली होती.

किशोरी पेडणेकरांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

शिवसेनेच्या मुंबई महापौरांची भाषा बघा. किशोरी पेडणेकर म्हणतात, भाजपचे नेते गांजा पिऊन बोलत आहेत, असं म्हणत किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवार म्हणतात हर्बल गांजा, नवाब मलिक म्हणतात हलका गांजा. ठाकरे सरकारचं गांजावर गजब प्रेम आहे, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किशोरी पेडणेकर शनिवारी पीपीई किट घालून वांद्रे जंबो कोविड सेंटरमधील रूग्णांच्या भेटीला गेल्या होत्या. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी विरोधकांच्या टीकेबद्दल बोलताना भाजपचे नेते गांजा पिऊन बोलत असल्याचं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या याच वक्तव्यावरून सोमय्यांनी टीका केली आहे.

ठाकरे सरकारच गांजावर गजब प्रेम आहे म्हणत सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल

पुढील काही दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

संसदेत कोरोनाचा उद्रेक, तब्बल ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं