मुंबई | मागील काही दिवसांपासून नवाब मलिक (Nawab malik) आणि किरीट सोमय्या (kirit sommaya) यांच्यातील वाद प्रकर्षाने समोर येत आहे. बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमिनीचा हा वाद समोर आला आहे.
खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
सातबारा हा मी जाऊन चेक करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. देवस्थानची जमीन या व्यक्तीवर कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे, असंही मागणी देखील सोमय्यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर देखील टीका केली होती. नवाब मलिक यांना मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, असंही सोमय्या म्हणाले होते.
त्यावरून आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्य भाषेत वक्तव्य केलं आहे. आपली बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांच प्रयत्न सुरूच असतात, अशी टीका मलिकांनी केली आहे.
चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत, अशी बोचरी टीका मलिकांनी यावेळी केली आहे.
बातमी कशी होईल यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू असल्याचं देखील मलिक म्हणाले आहेत. मलिकांच्या या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील नेते पातळी सोडून टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मलिकांच्या या वक्तव्याचा वाद आता आणखी किती पेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य
“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”
“… कबूलीनामा संजय राऊतांनीच दिलाय, पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना?”
महिंद्रांनी पाळला शब्द, जिप्सी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहारांच्या दारात उभी केली नवी कोरी बोलेरो