Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

जळगाव | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरुन राजकीय वर्तुळात वाद सुरु असल्याचं चित्र आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

राऊत आणि सोमय्यांचा वाद वाढत असतानाच आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे.

जळगावमध्ये गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे महिलांची रॅली निघाली. यावेळी गुलाबराव यांनी माध्यामांशी संवाद साधताना किरीय सोमय्यांवर अनेक टीकास्त्र सोडलेले पहायला मिळाले.

किरीट सोमय्या यांना कुठलाही कामधंदा नाही. उठसूठ माध्यमांसमोर काहीही बोलायचे, एवढंच काम त्यांना आहे. सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी सोमय्यांवर जहरी टीका केल्याचं पहायला मिळालं.

अलिबागमधील 19 बंगल्यांवरुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तरही दिलं आहे. मात्र यावरुन गेल्या तीन दिवसांपासून राऊत-सोमय्या वाद शिगेला गेल्याचं पहायला मिळत आहे.

रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत.

सोमय्या यांच्या दौऱ्यानंतर आता आणखी कोणता नवा वाद उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली होणार असल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ