मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मुंबई | आयएनएस विक्रांत निधी प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

अशातच अटकेपासून बचाव करण्यासाठी सोमय्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आता न्यायालयाने किरीट सोमय्यांना जोर का झटका देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सोमय्या पिता-पुत्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. जामीन अर्ज फेटाळ्याने आता सोमय्या पिता पुत्रांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

विक्रांत वाचवण्याकरिता गोळा केलेले पैसे जमा करायला राज भवनाचे कुठलेही खाते नव्हते. त्यामुळे किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतचा निधी पक्षाला दिला, अशी खळबळजनक माहिती किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी सेव्ह आयएनएससाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली?, याचा तपास करण्याकरिता आरोपीला कोठडी हवी असल्याचं वकिलांनी सांगितलं. त्यानंतर सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळ्यात आला.

दरम्यान, किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने दोन्ही पिता पुत्र नाॅट रिचेबल असल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

“अजून वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं”

“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’