Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालूच आहे. विरोधी पक्षातील नेते सतत कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याचा एकही मुद्दा भाजप नेते सोडत नाहीत.

भाजप नेते किरीट सोमैया यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे कुटुंबाला धारेवर धरलं आहे. सतत ते ठाकरे कुटुंबियांवर टीका करत आहेत. किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संबंधात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांची जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा आहे की इमारती बांधण्याचा?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

तसेच आदित्य ठाकरे हे 31 मार्च 2020 पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलीओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझीग्नेटेड पार्टनर होते. मंत्री बनल्यावर 4 महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात?, असाही सवाल सोमैया यांनी विचारला आहे.

सोमैया यांनी विचारलेल्या सवालांची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित द्यावीत, अशीही मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे. एखाद्या कंपनीचे डेझीग्नेटेड पद हे लाभाचे पद नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच या व्यवहारांवरून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ठाकरेंनी द्यावीत अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे, असंही किरीट सोमैया म्हटले आहेत. किरीट सोमैया यांनी नव्याने केलेल्या खुलास्यावर ठाकरे कुटुंबीय काय प्रत्युत्तर देणार?, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रश्मी ठाकरे यांच्यासोबतच सोमय्या यांनी मनीषा रवींद्र वायकर यांच्यावरही आरोप केले होते. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट करत रश्मी ठाकरेंवर आरोप केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्या परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध आहेत. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई येथून अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे तुम्ही यासाठी अर्णव गोस्वामी यांना लक्ष करत आहात का?, असा सवाल किरीट सोमैया यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’

धक्कादायक! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

नेहा कक्करने शेअर केला हनिमूनचा ‘तो’ फोटो, चाहत्यांनीही दिलं भरभरून प्रेम

‘बायकोनेच माझ्या खु.नाची सुपारी दिली’; ‘या’ बड्या भाजप नेत्याचा पत्नीवर धक्कादायक आरोप!

आयकर विभागाची मोठी कारवाई! पृथ्वीराज चव्हाण गजाआड जाणार?