‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वादाला नव्यानं सुरूवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 तारखेच्या सभेवरून वाद होत आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत नेत्यांची आणि केंद्रीय तपास यंत्रणांची भेट घेत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचे संकेत दिले होते.

उद्धव ठाकरेंचे मेव्हणे आणि मंत्री आदित्य ठाकरेंचे मामा श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती. त्यानंतर सोमय्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते.

आता सोमय्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील कारवाई होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. सोमय्यांनी थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधल्यानं वाद वाढण्याची शक्यता आहे.

7 कोटींच्या मनी लाॅंड्रिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात येणार असल्याचं वक्तव्य सोमय्यांनी केलं आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आहे याची चर्चा रंगली आहे.

ठाकरे सरकारकडे सत्ता आल्यापासून सर्वात जास्त आरोप करणारे सोमय्या हे सातत्यानं दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत.

सोमय्यांनी ठाकरे सरकारवर एकुण 26 आरोप केल्याचं म्हटलं आहे. त्यापैकी 100 कोटींचा शौचालय घोटाळा लवकरच बाहेर येणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव 7 कोटींच्या प्रकरणात समोर आल्यानं आता शिवसेना-भाजपमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर 

“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती”