मुंबई | एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अर्थात त्यांच्या टीकेचा मुख्य रोख शरद पवार यांच्या द्शेने असल्याचं दिसत होतं.
मलाड पूर्वमध्ये भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना सोमय्या यांनी हे टीकास्त्र सोडलं.
“समीर तू दलित नाही, तू मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं?, असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.
दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय, असं देखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ’उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करणार, अशी शपथ घेतली होती वाटतं. जिथं पाहा तिथं घोटाळे, अशी टीका किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दुसरीकडे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भलेही महाराष्ट्राला भ्रष्ट्राचारयुक्त केलं नसेल, पण आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारत महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करू. ठाकरे-पवारांनी मराठी माणसाच्या अस्मितेचं नाव घेत हे महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केलं आहे’, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गेल्या काही दिवसांपासून चांगलीच टीकेची राळ उडवली आहे.
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना अडचणीत आणण्याचं काम किरीट सोमय्यांकडून केलं जात आहे. आणखी काही जणांना येत्या दिवसात किरीट सोमय्या यांच्याकडून अडचणीत आणलं जाऊ शकतं.
किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांचे हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप चांगलेच गाजले होते.
दरम्यान, आता येत्या काही दिवसात त्यांनी अन्य काही मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड करण्याची घोषणा केली आहे. यासोबत तीन जावयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचं देखील समजत आहे.
किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांच्यावर आता हे गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीकडून या आरोपांना काय प्रतिउत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ही बातमी वाचली का?-
…तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर
भाऊ जेलमधून सुटला… बहिणीनं फुल्ल टू पार्टी केली, बघा सुहानाचे ते फोटो
महत्वाच्या बातम्या-
“हे पुड्या सोडायचे धंदे सोडून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या”
“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा
“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”