“ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोली दौऱ्यावर आहेत. सोमय्यांच्या दापोली दौऱ्यावरुन राजकारण जोरदार पेटल्याचं पहायला मिळत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांचं रिसाॅर्ट दापोलीत असून ते बेकायदेशीर आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. यावरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे.

रिसाॅर्टवरुन वातावरण तापलेलं असतानाच आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत म्हणाले की, भाजपने मला तुरुंगात टाकावे. यावरुनच सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला आम्ही तुमची परवानगी घेणार नाही. तुमचा घोटाळा बाहेर येईल तेव्हा थेट तुमच्यावर कारवाईच करू, अशी खरमरीत टीका सोमय्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर अनिल परब यांचा रिसॉर्ट वाचवून दाखवा आणि मी तोडून दाखवतो, असं चॅलेंजही सोमय्यांनी ठाकरेंना केलं आहे.

अनिल परब यांच्या कथित रिसाॅर्टवरुन आता वातावरण चांगलंच पेट घेतल्याचं दिसत आहे. दापोलीत पोलिसांचा बंदोबस्तही पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान

  ‘अनिल परबांचं रिसाॅर्ट तोडून दाखवणार’; किरीट सोमय्या आक्रमक

  Gold Rate: सोन्याच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो

  ‘सेनेचं मानसिक संतुलन बिघडलंय’; चित्रा वाघ भडकल्या