मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मेळ नसल्याचं म्हणत उद्धवा अजब तुझे सरकार आणि गजब तुझा कारभार, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेते संजय राऊत उवाच ‘वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम’वर कोरोनाचं क्वारंटाईन सेंटर उभारलं जाईल तर ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे सांगतात की पावसाळा तोंडावर आल्याने मैदानात चिखल होऊ शकतो. त्यामुळे तिथे क्वारंनटाईन सेंटर उभारले जाणार नाही, असं म्हणत किरीट सोमय्या सरकारमधील विसंवाद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एकाच मुद्द्यावर विरोधभासी मत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सांगतात दारू विकणार… मुख्यमंत्री म्हणतात विकू देणार नाही… उध्दवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला लक्ष्य करताना केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले, “महापौर पेडणेकर आणि संजय राऊत उवाच “वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम क्वारंटाईन सेंटर होणार” ! मंत्री आदित्य ठाकरे सांगतात तशे होवू देणार नाही !!!! उप मुख्यमंत्री सांगतात दारू विकणार, मुख्यमंत्री म्हणतात विकू देणार नाही. उध्दवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार!!”
महत्वाच्या बातम्या-
-सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
-अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख
-“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”
-संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर
-निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…