महाराष्ट्र Top news मुंबई

“हिंदूंवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील”

uddhav thackeray new 3

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या ( kirit somayya) यांनी अमरावतीत झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. सोमय्या सध्या अमरावती (Amravati) जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

13 नोव्हेंबरच्या हिंसाचाराचा हिशेब मागता. 12 नोव्हेंबरचा हिशेब कोण देणार? 12 तारखेच्या हिंसाचाराला पोलिसांनी परवानगी दिली होती का? मंदिरात पूजा करणाऱ्या पूजाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. आज बाळासाहेब नाहीत, पण तेव्हा आम्ही हिंदूंना वाचवण्यासाठी एकत्र होतो. यापुढे हिंदूंवर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची राहील, असा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

हिंसाचाराच्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी अमरावती दौऱ्यावर आल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं आहे.

शनी मंदिराचं दर्शन घेतलं, मारुतीचं दर्शन घेतलं. इथले पुजारी, महिला भाविकांशी बोललो. त्यावेळी तेथील महिलांनी जे वर्णन केलं ते ऐकून भीती वाटते. दंगलखोरांनी महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जर बाळासाहेब असते तर या दंगेखोरांनी असं केलं नसतं, असं सोमय्यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. 1993 मध्ये बाळासाहेब महिलांना वाचवण्यासाठी स्वत: पुढे आले होते, अशा शब्दात सोमय्या यांनी उद्धव ठारकेंवर हल्ला चढवला.

हा मुस्लिमांचा अत्याचार उद्धव ठाकरे सरकारमुळे आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला, अशी घणाघाती टीका सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

12 नोव्हेंबरला ज्या पद्धतीने महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या समर्थनाने तीन शहरात मुस्लिमांचे मोर्चे निघाले, हिंदुंना टार्गेट करण्यात आलं. त्याच दिवशी मला यायचं होतं, पण मला प्रतिबंध घातला. मी अमरावतीकरांना वचन दिलं होतं, म्हणून आज मी अमरावतीत आलोय, असं सोमय्या म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा…- देवेंद्र फडणवीस 

भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील 

‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज 

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता! 

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य