“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी…”

मुंबई | दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन काही फाईल्स चाळल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावरून आता चांगलाच वाद रंगला आहे.

कोणताही अधिकार नसताना किरीट सोमय्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसल्याने आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

तर किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. त्यावर आता खुद्द किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका देखील केली.

माझा दोष काय आहे? मी फक्त खुर्चीवर बसलोय. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत असल्याची टीका सोमय्या यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे खोटं बोलले त्यांची चोरी मी पकडली आहे, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बघा, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही भ्रष्टाचाराची लढाई आहे. लढाईच करायची असेल तर माझ्याशी करा, असं थेट आव्हान देखील किरीट सोमय्यांनी दिलं आहे. तर गरिब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असं वक्तव्य देखील किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

दरम्यान,आमच्या तिघांपैकी कुणीही हा फोटो काढला नाही. मी तिथं एकटाच होतो मग फोटो व्हायरल कुणी केला?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर शिवसेनेची खोचक टीका, म्हणाले “असा मस्तवालपणा…”

न्यायालयाचा नितेश राणेंना मोठा झटका, मारहाण प्रकरणी दिला हा निर्णय

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत’; राऊतांनी भाजप नेत्यांना झापलं

 “…तर राज्य सरकार चालवायची जबाबदारीही केंद्राकडेच द्या”

‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य