मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजपचे मोठे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट हा सध्या गप्पा आणि तर्क वितर्कांचा विषय बनला आहे.
ईडीच्या भितीने राज ठाकरे हे सध्या भाजपसोबत जवळीक साधत आहेत आणि भाजपच्या भेटीगाठी घेत आहेत, असा आरोप मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केला आहे.
काल (दि. 30) रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले हाच एक मोठा गौप्यस्फोट आहे. आता आणखी काय स्फोट होणार आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू देत.
एकनाथ शिंदे यांनी मी बरेच काही बोलू शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या मागे लागलेले हे शुक्लकाष्ट संपूदे, अशी प्रार्थना त्यांनी आज गणपतीकडे केली आहे.
किशोरी पेडणेकर यांना शिवसेनेचे उपनेतेपद देण्यात आले आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचे हे फळ आहे, असे पेडणेकर म्हणाल्या. तसेच आज गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी गणपतीकडे मागणी केली की, शिवसेनेच्या मागे लागलेले हे शुक्लकाष्ट लवकर संपावे आणि शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या खटल्यावर लवकर निर्णय व्हावा, असे देखील पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
झारखंडचे मुख्यमंत्री आणि आमदार छत्तीसगढला अज्ञातस्थळी गेले; सांगितले ‘हे’ कारण
‘पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल
अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर
बाबरी मशीद आणि गुजरात दंगलीवर न्यायालयाचा मोठा निर्णय