‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’, इंदुरीकर महाराजांचं परखड मत

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदेंनी टाकलेल्या बंडखोरीच्या ठिणगीचा आता वणवा पेटलेला पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शिवसेनेची गळती कायम असल्याचं चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असून सत्तापालट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत.

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनीही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून प्रतिक्रिया दिली आहे. खुर्चीच्या लोभापायी विरोधकही एकत्र आले. मात्र, त्यांनी तुम्हाला विचारलं का? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि असेच मरा, असं परखड मत व्यक्त करत इंदुरीकर महाराजांनी सामान्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन दिवस झाले राज्यात कोणालाच सुधरत नाही, असा टोला देखील इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सध्या अनेक मीम्स, जोक पाहायला मिळत आहेत. त्यात इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या खास शैलीत सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”

शिवसेनेनं केलेल्या ‘या’ मागणीमुळे एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या