कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!

अहमदनगर | निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना डॉक्‍टरांनी सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितलं आहे.

प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही. त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगीर आहोत, असं त्यांनी म्हटलंय.

वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आर्शिवाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा. सहकार्याबद्दल धन्यवाद, असे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास संगितलं आहे. यापूर्वी इंदुरीकर महाराज परतूर शहरात कीर्तनासाठी निघाले असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता.

सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. यावेळी ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. यावेळी लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं; मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच केली हकालपट्टी 

 ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल

“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन” 

“भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?” 

“तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती”