मुंबई | कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व नियम पाळा. निर्बंधांचं पालन करा आणि घरातच राहा. अन्यथा नाईलाजाने मिलिट्रीला बोलवावं लागेल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
आव्हान मोठं आहे मात्र नागरिकांना साथ दिली तर त्या आव्हानाला आपली यंत्रणा यशस्वीपणे सामोरे जाईल. नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. आज सायंकाळपासून काटेकोर निर्बंध लावले जाणार आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
जर आपल्याला काही कारणाने मिलिट्रीला बोलवावं लागलं तर अडचणी वाढतील. आत्ता तरी काही प्रमाणात बाहेर जाता येत आहे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत आहे. मात्र मिलिट्री आल्यावर या सर्व सोयी सुविधा बंद होईल. मिलिट्री कुणाचंही ऐकणार नाही, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराच्या नावाखाली सुरु असणाऱ्या लुटीवरही पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा
-“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”
-“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी?”
-“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”
-राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार