मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी चार दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या दापोली येथे एक सभा घेतली.
यावेळी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अतिशय अर्वाच्च भाषेत टीका केली आणि त्यामुळे शिवसेना भरपूर आक्रमक झालेली पहायला मिळाले.
शिवसेनेच्या वतीने भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिले होते. त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी देखील त्यांना आव्हान केले आहे.
आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांनी देखील रामदास कदम यांचा समाचार घेतला आहे. रामदास कदमांचे वक्तव्य माँसाहेबांचा अपमान करणारे होते, असे त्या म्हणाल्या.
रामदास कदमांनी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचाच मुलगा आहे ना, की त्यांना काही संशय आहे, असा प्रश्न केला होता. त्यावरुन पेडणेकर म्हणाल्या, हा मीनाताई ठाकरेंचा अपमान आहे.
त्याचबरोबर ज्यांच्या हातचे खाल्ले त्यांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, असे मत किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केले. हे अत्यंत वाईट आहे. मरण पावलेल्या दोनही व्यक्तींबद्दल असे बोलणे योग्य नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.
तुम्ही तुमच्या बापाच्या नावावर कधी लढला नाहीत. लढलात ते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर. उद्धव ठाकरे त्यांच्या वडिलांचे नाव सतत घेत असतील, तर ते तुम्हाला का टोचते, असे देखील पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा दणका देण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…
पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर
खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी
प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…