मुंबई | देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईत आहे. मुंबईतील कोरोनाचा वाढता फैलाव बघता मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
इकबाल चहल यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार का?, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत लॉकडाऊनच्या चर्चा सुरू असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.
मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नसल्याचं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. एका वृत्तवाहीनीशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी ही खदखद बोलून दाखवली आहे.
बीएमसी कमिशनर चहल आणि सनदी अधिकारी आम्हाला विश्वासात घेत नाहीत हे नक्की आहे. परंतू ते जरी घेत नसले तरी आमची जबाबदारी आहे, असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.
स्वत: आदित्य ठाकरे फिरतायत, मी स्वत: फिरतेय. काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत. पण त्यांनी सांगावं म्हणून सतत रेटा लावणं त्यापेक्षा आम्ही कामावर जोर देत आहोत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
ते विश्वासात घेत नाहीत हे खरं आहे. पण त्यांनी घ्यायला हवं, कारण तो त्यांच्या कामाचा एक भाग आहे, अशी खंत किशोरी पेडणेकरांनी बोलून दाखवली आहे.
उद्धवजी कायम सांगतात की लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. आपल्याला लॉकडाऊन करायचाच नाही. परंतू लोक स्वैर वागत आहेत. मुंबईकरांनी अनेक आव्हानं पेलली आहेत. अनेक आव्हानं त्यांनी परतवली, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत रूग्णसंख्या चार पटीने वाढत आहे. या चार पटीने वाढणाऱ्या रूग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक तत्वं पाळायलाच हवीत, असं आवाहन किशोरी पेडणेकरांनी केलं आहे.
दरम्यान, लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. मास्क लावणंही मस्ट आहे, अशा सूचना देखील किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही
नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!
अनिल परब केंद्राच्या रडावर, लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई
इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न; ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू
दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी