मुंबई | राज्यात सध्या आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहेत. शिवसेना आणि शिंदे गट यांचे वाद तर आहेतच पण त्याचबरोबर आता अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे देखील महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या निर्धाराने खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) मुंबईत आले होते.
त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. काही काळाने त्यांची सूटका देखील करण्यात आली होती. तेव्हापासून राणा दाम्पत्य शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सतत विविध आरोप करत आहेत.
अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Aarati Singh) यांनी अडीच वर्षांत महिन्याला 7 कोटी रुपये उद्धव ठाकरे यांना दिले, त्याची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत, असा दावा राणा यांनी केला.
त्यावर बोलताना मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आम्ही घरंदाज बायका आहोत, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही.
ज्या मुलीने वयाच्या 13 व्या वर्षी घाण्यारड्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळविली, तिच्यावर आम्ही काय बोलणार, आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी नवनीत राणांविरोधात आक्षेपार्ह आणि वादग्रस्त दावे केले आहेत. त्यामुळे आता ही वादाची ठिणगी पडणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही या अजित पवारांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर
“नरेंद्र मोदींनंतर भाजप सोनिया गांधी यांना…”; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
“…तर हा आशिष शेलार सुद्धा कुरेशी”; आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल
“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा