मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा काल ऑगस्ट क्रांती दिनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिंदेसेनेच्या नऊ आणि भाजपच्या नऊ अशा एकूण अठरा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
शिवसेनेेत मंत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदे मिळाली. शिंदेंच्या या विस्तारात त्यांनी अपक्षांना आणि महिलांना डावलले. त्यामुळे शिंदे यांच्यावर टीका सुद्धा झाली आहे.
शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या शपथविधीवर भाष्य केले आहे. आमच्यातून गेलेले आणि शिवसेना आणि मुंबई आमची आहे, असे म्हणाऱ्यांपैकी एकही आमदार मंत्री होऊ शकला नाहीत, असे पेडणेकर म्हणाल्या.
मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांना विधी आणि न्याय खाते मिळाले आहे. त्यावरुन पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका केली आहे. मंगलप्रभात लोढा यांना मंत्री केल्याबद्दल मी फडणवीसांचे आभार व्यक्त करते. मराठी माणसांच्या मुंबईतून त्यांनी मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपद दिले. तो त्यांचा अजेंडा आहेच, असे पेडणेकर म्हणाल्या.
आमच्याकडून गेलेला शिवसैनिक मुंबई आमची आहे, असे म्हणणारा एकही मुंबईचा आमदार मंत्री होऊ शकला नाही, ही मुंबईची (Mumbai) शोकांतिका आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
तसेच जे मंत्री झाले त्यांचे पाळणे वेगवेगळ्या पक्षात हलले आहेत. शिवसेनेने त्यांना बहुमान दिला. आजही शिवसेना आमची, धनुष्यबाण आमचे, बाळासाहेब आमचे म्हणायचे पण बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) विसरायचे.
शपथ घेतलेल्या एकाही मंत्र्याला असे वाटले नाही की, आपण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जावे आणि दर्शन घ्यावे. याचाच अर्थ स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे, त्यांचे नाव वापरायचे, असे पेडणेकर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
‘पाळणा हलला पण दोऱ्या कोणाकडे?’, शिवसेेनेकडून नवीन मंत्रिमंडळाचा समाचार
शरद पवारांचे भाजपवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
‘… त्याचेच परिणाम शिवसेनेला भोगावे लागतायत’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?
शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…