महाराष्ट्र Top news मुंबई

लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

kishori pedanekar

मुंबई | कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटने देशात खळबळ माजली आहे. हा व्हेरियंट आल्यानंतर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनेबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

दक्षिण अफ्रिकेतून आतापर्यंत 87 लोक आलेत. आता सगळ्यांनीच सतर्क होण्याची गरज आहे. कोविड सेंटर सज्ज आहेत. आता ते पुन्हा अ‌ॅक्टीव्ह करावे लागणार आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

काही कोविड सेंटर बंद ठेवली होती मात्र आता ती पुन्हा सरु करण्यासाठी पालिका सज्ज असल्याचं महापौर म्हणाल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत आयुक्त उत्सुक नव्हते, आज मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत आयुक्तांची बैठक आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले नाही आणि पालक सुद्धा मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते अशी माहिती शाळांबाबत महापौरांनी दिली आहे.

जे करता येईल ते ते करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. लाॅकडाऊन कोणालाच नको आहे मात्र नियमावली पाळा असं आवाहनही महापौरांकडून करण्यात आलं आहे.

एअरपोर्टबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. तसेच बाहेरील देशातून आलेल्या व्यक्तींची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कुटंबीयांची चाचणी केली जाईल, असं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, नव्यानं ओमिक्रोन आढळलेल्या देशाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत जवळपास दीड डझन देशात ओमिक्रोनच्या नव्या विषाणुचा प्रसार झालाय.

सुरूवातीला फक्त दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ओमिक्रोन व्हायरस आता 16 देशात आढळून आल्याची नवी यादी समोर आली आहे. यामुळे देशासह जगाचं टेंशन वाढलं आहे.

अनेक देशांनी दक्षिण अफ्रिकेत हा विषाणू आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. तरीही या विषाणुचा प्रसार रोखता आला नाही, या वाढलेल्या यादीवरून त्याच्या प्रसाराच्या वेगाचा अंदाज येतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ लोकांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा अधिक धोका! 

अमृता फडणवीस राजकारणात येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य 

“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेवायला बोलवलं तर…” 

“कोण म्हणतं की लोकसभा कामासाठी आकर्षक जागा नाही” 

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं