केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच…

मुंबई | केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. केकेच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेंच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे.

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला.

त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

कॉलेजच्या फेसबुक पेजवरुन केके एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या कॉन्सर्टमधील शेवटच्या काही मिनिटांमध्ये आणि मृत्यूच्या काही तास आधी केके ‘कल हम रहे न रहें कल.. याद आऐंगे ये पल…’ गाणं गाताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. ‘यारों दोस्‍ती बड़ी ही हसीन है…’ हे गाणंही त्याने या कॉन्सर्टमध्ये गायलं होतं.

दरम्यान, केके याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडव तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बाॅइज, तसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-  

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त  

मोठी बातमी! राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

धक्कादायक! प्रसिद्ध गायक केके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

बैल कधी एकटा येत नाही, तो नांगर घेऊन येतो तसा मी ही- देवेंद्र फडणवीस 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, पण दिल्लीसमोर झुकणार नाही”