नवी दिल्ली | आयपीएल 2020 च्या मोसमात अनेक नवखे आणि युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहे. त्यातल्या त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधार केएल राहुल या खेळाडूचे नाव सतत चर्चेत आहे.
सध्याच्या आयपीएल मोसमात केएल राहुल जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. रविवारी आयपीएलचा 36 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला.
या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधार केएल राहुल याने 51 चेंडूत 77 धावा केल्या. या सामन्यात त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. याचबरोबर केएल राहुल याने या मोसमातील 500 धावा पूर्ण केल्या आहेत.
या मोसमातील 500 धावा पूर्ण करणारा केएल राहुल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. केएल राहुल याने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यात त्याने 525 धावा केल्या आहेत.
याचबरोबर त्याने एक शतक आणि पाच अर्धशतक केले आहे. याच्या व्यतिरिक्त केएल राहुल याने मुंबई विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील 2500 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
2020च्या आयपीएलमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडत केएल राहुल याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. असा विक्रम करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत. एवढंच नाही तर केएल राहुल यांनी सलग तीन वर्ष 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
केएल राहुल याच्या अगोदर सचिन तेंडुलकर, सुरेश रैना आणि विराट कोहली याने सलग दोन वर्ष आयपीएलमध्ये 500 धावा केल्या होत्या. या तीनही दिग्गज खेळाडूंची बरोबरी केएल राहुल याने मागच्या वर्षीच केली होती.
2018 मध्ये केएल राहुल याने एकूण 18 आयपीएल सामने खेळले होते. यात त्याने 659 धावा केल्या होत्या. 2019 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 593 धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यातच या वर्षी केएल राहुल याने 9 सामने खेळले. या सामन्यात त्याने 525 धावा केल्या आहेत.
केएल राहुलच्या आयपीएल सामन्यांबाबत बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत 76 सामने खेळले आहेत. ज्यात दोन शतक आणि 21 अर्धशतक यांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर
आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!
भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट
पायल घोष अनुरागनंतर आता ‘या’ बड्या खेळाडूवर गंभीर आरोप करत म्हणाली…
भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?