मुंबई | कोरोना (Corona) काळात अनेकांना घरूनच काम करण्याची संधी मिळाली. आता कोरोना आटोक्यात आला असता तरी अनेक कंपन्यांनी घरूच कामाची पद्धत सुरू ठेवली आहे. त्यामुळे आता अनेकांना याचा फायदा होताना दिसतोय.
अनेक ठिकाणी आता बैठी काम असल्याने शारिरीक हालचाल कमी होत असते. त्यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्या देखील जाणवतात. अशातच अनेकांना गुडघेदुखीची समस्या (Knee pain) देखील जाणवू लागली आहे.
आजकाल तरुणांमध्येही गुडघेदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत. गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, जी कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते.
गुडघेदुखी केवळ वृद्ध लोकांमध्येच नाही तर तरुणांमध्येही दिसून येते. ज्येष्ठ ऑर्थोपेडिक डॉ. जेफ्री व्हॅन थिएल यांच्या मते, जेव्हा गुडघ्याचे स्नायू, अस्थिबंधन आणि कंडरा जास्त काम करतात तेव्हा गुडघ्यात वेदना, कडकपणा आणि इतर लक्षणे विकसित होऊ लागतात.
टेंडोनिटिस आणि बर्साइटिस यामध्ये देखील समान परिस्थिती आहेत. काही काळनंतर अचानक क्रिया केल्याने अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. तरुण लोकांमध्ये गुडघेदुखी सहसा संधिवातामुळे होत नाही.
गुडघेदुखी हे पॅटेलोफेमोरल सिंड्रोममुळे असू शकते. पटेललोफेमोरल सिंड्रोम ही अशीच एक स्थिती आहे, ज्यामुळे गुडघ्यासमोर आणि गुडघ्याभोवती वेदना होतात.
दरम्यान, यासाठी दररोज काही प्रमाणात चालणं गरजेचं आहे. शरिराला सहन होईल, त्याप्रमाणे नियमित चालल्याने गुडघेदुखीवर मात करता येऊ शकते. त्याचबरोबर डाॅक्टरांचा सल्ला घेणं देखील गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”
Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं
नोरा फतेहीचा 10 वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
ममता बॅनर्जी शाळकरी विद्यार्थ्यांबाबत घेणार ‘हा’ मोठा निर्णय
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य