धक्कादायक! कोरोनामुळे मृत्यु झाल्याने थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच केले सपासप वार

मुंबई | राज्यात लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यु झाल्याने लातूर शहरात एका डॉक्टरवर चाकूने वार केले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरानाच्या लढ्यात शुर योद्ध्याप्रमाणे लढणाऱ्या डॉक्टरांवर अशा प्रकारचे हल्ले होणं खरोखरच खूप वाईट गोष्ट आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महिलेचा कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यु झाला. मात्र त्या महिलेच्या मुलाने मनात राग धरून डॉक्टरवर चाकूने साहाय्याने छातीवर, मानेखाली आणि हातावर वार केले आहेत. हल्ला झालेल्या डॉक्टरांच नाव  दिनेश वर्मा, असं आहे आणि हल्ला केलेल्या आरोपीचं नाव नटवरलाल सगट आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान डॉक्टरांवरील हल्ल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूरने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान,  लातूरच्या ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत तिथे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे डॉक्टरांचे मनोधैर्य खचले असल्याची भावना आयएमएच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! 10 ऑगस्ट पर्यंत कोरोनाची लस येणार?

‘या’ भाजप आमदाराच्या भावाच्या मॅरेज हॉलवर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चांगली बातमी! पुण्यात आज दिवसभरात 2 हजारांहून अधिक रूग्णांची कोरोनापासून सुटका

कौतुकास्पद! पुण्यात हॉटेलमध्ये काम करून रात्रशाळेत शिक्षण घेत ‘तीनं’ मॅट्रीकमध्ये मिळवलं यश!

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला, देशात काय सुरू आणि काय बंद?; वाचा एका क्लिकवर