पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याने अभिषेक

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच तापलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोर्चेकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याचा अभिषेक घातला आहे. 

कोल्हापूरमध्ये काल एका मराठा तरूणाने आत्महत्या केली होती. त्यामुळे आज दसरा चौकात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गटारीतल्या पाण्याचा अभिषेक घातला. 

मराठा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान, मराठा आरक्षणावर सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. 

IMPIMP